चोपडा ता चोपडा मधील कृष्णापुर या गावातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांचा शेतजमीन बळजबरीने बळकट करण्याचा प्रयत्न शासन व प्रशासन कडुन करण्यात येत आहे.
1 min read
😊 Please Share This News 😊
|
संवाददाता ::महाराष्ट्र:: सचिन भाविस्कर :: Date ::03 .12 .2022 ::चोपडा ता चोपडा मधील कृष्णापुर या गावातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांचा शेतजमीन बळजबरीने बळकट करण्याचा प्रयत्न शासन व प्रशासन कडुन करण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्य़ातील ता चोपडा मधील कृष्णापुर गावातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना शासन व प्रशासना कडुन दबाव तयार करूण त्यांचा शेतजमीन बळकवून लावण्याचा प्रयत्न केला जात आहेत
जी जमिनी १९५५ /१९५६ मध्ये शासन ने शेतकऱ्यांच्या नावाने करण्यात आल्या होत्या, त्या बाबतच्या पुरावा म्हणजे शेतीचा उतारावर नाव असने, जुुने उतारे त्यांच्या नावाने आहे, २०१२- १४ पर्यंतचे ऑफलाईन चे उतारे हे शेतकऱ्यांचा नावाने आहे.व नंतर जे ऑनलाईन पध्दती मध्ये इतरांंचे उतारे टाकण्यात आले , त्या ऑनलाईन पध्दतीत ह्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांचे उतारे का टाकण्यात आले नाही? , असा प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे, ह्या सर्व घटनांबद्दल सविस्तर माहीती तिथल्या शेतकऱ्यांनी बहुजन समाज पाटीॅ चा चोपडा विधानसभाध्यक्ष सचिन बाविस्कर, शहर अध्यक्ष रूपचंद भालेराव , वसंत शिंदे हे ह्या घटने बाबत शेतकऱ्यांना भेटावयास गेले असतांनाच तीथल्या शेतकऱ्यांनी यांना सविस्तर माहीती दिली .
बसपा ने ह्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे , व लागेल ती मदत बसपा देईल, तसेेच कायदेशीर लढ्याला बसपा तुमचा सोबत आहे , असा विश्वास विधानसभाध्यक्ष सचिन बाविस्कर यांनी व्यक्त केला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |